उपवासाचा केक

उपवासाचा केक

 1. अर्धी वाटी दूध गरम करून खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे
 2. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा व वेलची पावडर एकत्र करून तीन ते चार वेळा चाळून घ्यावे.
 3. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या.
 4. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे.
 5. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे.
 6. त्या मिश्रणात पिठी साखर घालून नीट मिसळावी.
 7. केक बॅटर मध्ये अर्धे काजू/बदामाचे काप टाकून मिक्स करावे(टीप १)
 8. ज्यात केक बनवायचा त्या भांड्याला तुपाचा हात लावून थोडे शिंगाडा पीठ घालून एकसारखे करून घ्या.
 9. आता त्यात मिश्रण ओतावे व वरून उरलेले काजू बदाम घालावे.
 10. १८० डिग्रीवर ३५ मिनिटे बेक करावे.
 11. कुकर मध्ये करायचे असल्यास केक चे भांडे कुकर मध्ये ठेऊन पहिली १० मिनीट फुल गॅस वर व नंतर मध्यम गॅस करून २० मिनीट बेक करावा.(टीप २)
 12. टीप:
 13. १. काजू बदाम केक मध्ये किंवा वरून घालण्याआधी त्यात १/२ tsp पीठ घालून घोळून घ्यावे म्हणजे केक बेक होताना ते तळाशी जात नाही.
 14. २. कुकर मध्ये फरक असल्यामुळे २०-२५ मिनीट नंतर सुरी केक मध्ये घालून झाला की ते बघून घ्यावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा