गृहकर्जावर ओव्हरड्राफ्ट फायदेशीर

घर खरेदीसाठी बँकेकडून गृहकर्ज मिळते. त्याचबरोबर गृहकर्जावर ओव्हरड्राफ्टची देखील सुविधा दिली जाते. ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय राहू शकतो. यानुसार अडचणींच्या काळात गरज पडल्यास आपण एक रक्कमी पैसा हा बचत खात्याप्रमाणे गृहकर्जातून काढू शकतो. अर्थात काही अटींच्या आधारावर बँका ओव्हरड्राफ्ट देते.

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय : गृहकर्ज घेणार्‍या सर्व कर्जदारांना दरमहा निश्‍चित कालावधीपर्यंत ठराविक रक्कम हप्त्याच्या रुपातून जमा करावी लागते. त्याचवेळी गृहकर्जाच्या मुद्दलमध्ये आगावू रक्कम भरल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही. ओव्हरड्राफ्टच्या नियमानुसार जर आपण नियमित हप्त्याशिवाय आगावू रक्कम जमा केली असेल तर ती रक्कम गरज पडल्यास आरामात काढू शकता.

सुविधेचा लाभ घेताना : दहा टक्के व्याजाने वीस वर्षासाठी 30 लाखाचे गृहकर्ज घेतले असेल तर आपल्याला सुमारे 29 हजार रुपये हप्ता बसेल. एक वर्षानंतर आपल्याकडे एक लाख रुपये जमा होत असतील आणि ते गृहकर्जाचा बोजा कमी करण्यासाठी हप्त्याव्यतिरिक्त जमा करु शकतो. त्यावेळी आपले मुद्दल 29 लाख 50 हजार असेल आणि अतिरिक्त रुपये जमा केले तर मुद्दल 28.50 लाख राहिल.त्याचबरोबर गरज पडल्यास आपण आगावू भरलेले एक लाख रुपये काढून घेऊ शकता.

सामान्य कर्जापेक्षा वेगळे कसे : आपण जेव्हा सामान्य गृहकर्ज घेतो तेव्हा 50 हजार किंवा एक लाख रुपये जमा करतो. त्यामुळे कर्जाचे ओझे कमी होते. गरज पडल्यास अतिरिक्त भरलेली रक्कम काढून घेतल्यास कर्जाचे ओझे पुन्हा वाढते.

अन्य कर्जापेक्षा स्वस्त : कठिण काळात ग्राहकांसाठी पर्सनल लोक हा एक सोपा पर्याय आहे. मात्र अशा प्रकारचे कर्ज पाच वर्षासाठी मिळू शकते आणि त्याचा व्याजदर हे 18 टक्क्यांपयर्र्ंत असते. कालावधी कमी असल्याने त्याचा हप्ताही अधिक असतो. त्याचवेळी होमलोन ओव्हरड्राफ्टची सुविधा ही नियमित व्याजदरापेक्षा 0.05 ते 0.25 टक्के अधिक दरावर मिळते. हे पर्सनल लोनपेक्षा बर्‍याचअंशी स्वस्त आह

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा