ध्यान-धारणायुक्त शिक्षण काळाची गरज-अनिल राठोड

किडस् सेकंड होम स्कूलच्या नूतन जागेत उत्साहात स्थलांतर

अहमदनगर- देशाचा पाया शिक्षण आहे. हा पाया पक्का झाला तर येणारी पिढी खंबीर होऊन आपला देश पुढे जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा लहानपणीच पाया पक्का होणे आवश्यक आहे. ज्या शैक्षणिक संस्था अध्यात्मास धरुन ज्ञानदान करतात तेथे आपल्या देशाची संस्कृती जपली जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये बदल होण्यासाठी ध्यान-धारणायुक्त शिक्षण काळाची गरज आहे. हेच ओळखून श्रीनिवास बोज्जा यांनी आपल्या किडस् सेकंड होमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्याबरोबरच सहजयोगाच्या माध्यमातून ध्यान-धारणेचे धडे देत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल आहे. या शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व येथून आदर्श विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले.

बोल्हेगांव येथील विश्‍व निर्मल फौंडेशन संचलित किडस् सेकंड होम या इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळेचे नूतन वास्तूत स्थलांतर व नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते व भाजपाचे ज्येष्ठ अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात झाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष उमेश तोगे, सचिव डॉ.लक्ष्मीकांत पारगांवकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर वाकळे, जिल्हा सहजयोग कमिटीचे अध्यक्ष अशोक कोतकर, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, कमल सप्रे, रिता भाकरे, माजी नगरसेवक वाय. प्रकाश येनगंदुल, डॉ. डी.डी.कुलकर्णी, संतोष म्हस्के, शरद ठाणगे, माजी नगरसेविका विणा बोज्जा, मुख्याध्यापिका दिपाली भोसले आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अभय आगरकर म्हणाले, बोल्हेगांव परिसरात सर्वसामान्य चाकरमाने नागरिक वास्तव्यास आहेत. प्रत्येक पालकाचे आपला पाल्य सुशिक्षित व सुसंस्कृत व्हावा हे स्वप्न असते. सर्वसामान्य कुटूंबातील पालकांचे स्वप्न किडस् सेकंड होम स्कूलच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे. महागड्या शाळांच्या युगात नाममात्र शुल्कात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे अशा चांगल्या छोट्या शाळा स्पर्धेच्या युगात टिकल्या पाहिजे. यावेळी दत्ता सप्रे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्रास्तविकात संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून बोल्हेगांव परिसरातील सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना केवळ 7 ते 8 हजार रुपयांत सर्व सुविधांयुक्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देत आहोत. सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजीचे ज्ञान व्हावे, हा या मागील उद्देश आहे. सहजयोगाच्या माध्यमातून किडस् सेकंड होम मधील सर्व विद्यार्थ्यांना ध्यानधारणायुक्त शिक्षण देत आहोत. त्यामुळे सर्व लहान विद्यार्थ्यांमधील चंचलता कमी झाली असून, त्यांच्यात अमुलाग्र बदल झाले आहेत.

यावेळी चंद्रकांत रोहोकले, संदिप ठोंबरे, संदिप गांगर्डे, चंद्रकांत बारस्कर, नितीन किंगर, संपत नलावडे, अंबादास येन्नम आदींसह सहजयोग परिवाराचे सदस्य उपस्थित होते. डॉ.लक्ष्मीकांत पारगांवकर यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा