चारचाकी वाहन चोरणारे पकडले

नगर- शहर परिसरातून चारचाकी वाहन चोरुन नेणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नगर-पुणे रोडवर शिताफीने पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.3) नगरपुणे रोडवर एमआयडीसीकडे जाणार्‍या रोडवर केली. या कारवाईत पोलिसांनी गणेश शिवाजी लोखंडे (वय 20, रा.लोंढे मळा, केडगाव), संकेत सुनील खापरे (वय 21, रा.विनायक नगर, अ.नगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीची 50 हजार रुपये किंमतीची स्विफ्ट कार (एम.एच.20, ए.जी.6758) ही जप्त केली.

याबाबतची माहिती अशी की, विजय प्रभाकर लटंगे (रा.सिडको, औरंगाबाद) हे यांनी त्यांच्या मालकीची स्विफ्ट गाडी (एम.एच.20, ए.जी.6758) नगरमधील त्यांचे मित्र शशिकांत शिवाजी देशमुख (रा. सिद्धविहार अपार्टमेंट, बोरुडे मळा) यांच्या घरा समोरील पत्र्याच्या शेडमध्ये पार्किंग करुन ते मुंबईला गेले असता त्यांची कार दि.25/11 रोजी चोरीस गेली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना या घटनेतील चोरीची कार ही गणेश लोखंडे याने चोरी असून तो सुपा एमआयडीसी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुपा एमआयडीसी चौक नगर-पुणे रोड येथे नजन ठेवली असता त्यांना सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट कारमधून पुणे रोडने एमआयडीसीकडे दोन इसम जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून कारविषयी चौकशी केली असता त्यांनी कार बोरुडे मळा येथून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक करुन मुद्देमालासह तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील जमादार सोन्याबापू नाणेकर, हे.कॉ. विजय वेठेकर, पो.ना.रविंद्र कर्डिले, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगसे, सागर ससाणे, संदीप चव्हाण व प्रकाश वाघ यांनी केली आहे. अटक आरोपी गणेश लोखंडे याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरी व चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. तर संकेत खापरे याच्याविरुद्ध जबरी चोरी व चोरीचे कोतवाली पोलीस ठाण्यात चार व तोफखाना पोलीस ठाण्यात एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा