शिराढोणमध्ये विविध कार्यक्रमांनी आदिवासी दिन साजरा


अहमदनगर : नगर तालुक्यातील शिराढोण येथे विविध कार्यक्रमांनी आदिवासी दिन साजरा करण्यात आला. एकलव्य टायगर ग्रुप, एकलव्य भिल्ल समाज संघटना, आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी वीर एकलव्य, आद्यक्रांती कारक राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, छत्रपती शिवजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आदि प्रतिमाचे पूजन करण्यात आले. व गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
अध्यक्ष राजेंद्र काळे, अशोक मोरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले , बाळासाहेब हराळ, तानाजी जाधव, पंचायत समिती सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, सुधीर भद्रे ,अशोक कोकाटे, बबन शेळके, आण्णासाहेब फुनगे उपस्थित होते.
यावेळी महेश वाटाडे यांनी समाज बांधवाना व्यसनमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिक वाघ, किरण वाघ, महेश वाटाडे, अरूण मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महेश वाटाडे यांनी केले तर आभार किरण वाघ यांनी मानले. यावेळी पप्पूदादा गांगुर्डे, कृष्णा गायकवाड़, रावसाहेब पवार, बाळासाहेब गदादे, प्रल्हाद सोनवणे, किशोर वाटाडे, आदी सह आदिवासी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.