‘सर्व्हर डाऊन’मुळे दस्त नोंदणीत येत आहेत अडथळे; नागरिकांची गैरसोय

नगर – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्तनोंदणी प्रणालीमध्ये वेग कमी होणे, अनेक तास सर्व्हर डाऊन होत असल्याने दस्त नोंदणीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना अनेक तास कार्यालयात बसून रहावे लागत आहे. गेल्या वीस दिवसांपासून ही अडचण निर्माण झाली आहे.

घरे, जमिनींच्या खरेदी-विक्रीची नोंद करण्यासाठी दुय्यम निंबधक कार्यालयात जावे लागतो. गेल्या काही वर्षांपासून हे कामकाज ऑनलाइन झालेले आहे. त्यामुळे दस्तनोंदणीचे काम वेगात होणे गरजेचे होते. परंतु, मुद्रांक विभागाचे मुख्य सर्व्हर डाऊन होणे, वेग कमी होणे असे प्रकार होत आहे. गेल्या वीस दिवसांपासून दस्तनोंदणीमध्ये आणखी अडथळे येत आहे. त्यामुळे दस्तनोंदणीसाठी येणाऱ्यांना अडथळा येत आहे. त्यामुळे काही वकिलांनी याबाबत नगरचे मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात येणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत. तलाठी कार्यालयातून प्राप्त झालेले सात-बारा उताऱ्यातील नोंदी व दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रणालीमधील नोंदीमध्ये तफावत असल्याने नागरिकांना दस्तांना टोकन पडत नाही. त्यामुळे दस्तांची नोंदणी होत नाही. ही तफावत प्रत्यक्ष दस्त नोंदणीसाठी आल्यानंतर निदर्शनात आणून दिली जाते. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीसाठी हजर केल्यानंतर एलआर नोंदीतील तफावतींमुळेच दस्त नोंदविले जात नाही. काही वेळेस दस्तांना जरी टोकन पडले तरी अनेकदा लिंक बंद पडते किंवा त्यास वेग नसतो. त्यामुळे दस्तांची नोंदणी रेंगाळते. तर अनेक वेळा लाइट नसल्याने संगणक प्रणाली बंद पडते. त्यामुळे दोन-दोन दिवस दस्त नोंदणी होत नाही. या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी वकिलांनी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. श्याम असावा, अॅड. दीपक धीवर, अमनोल डोंगरे, संदीप भोगाडे, प्रणव धर्माधिकारी, पल्लवी शिंदे, गौरव भोसले, पुष्पा रोहकले आदी या वेळी उपस्थित होतें.

लवकर ही प्रणाली सुरुळीत होईल

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रणालीमघ्ये गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाला आहे. एकच सर्व्हर असल्याने राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात समस्या आहे. वरिष्ठस्तरावर हा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकर ही प्रणाली सुरुळीत सुरू होईल.असे मुद्रांक उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा