कोबी वडा

साहित्य : कोबीची 8 पाने, 4 उकडलेले बटाटे, अर्धा कप उकडलेले मटार, 1 लहान चमचा चाट मसाला, 1 कप बेसन, 1 चमचा मिरची पूड, अर्धा चमचा सोडा, 1-2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती : कोबीची पाने गरम पाण्यात उकळून घ्यावीत. बेसनामध्ये मीठ, सोडा, मिरची पूड टाकून मिश्रण बनवून घ्यावे. बटाटे कुस्करून त्यात मटार, चाटमसाला, हिरव्या मिरच्या बारीक चिरून व मीठ टाकावे. हे मिश्रण उकडलेल्या कोबीच्या पानात टाकून रोल बनवावेत. हे रोल बेसनात बुडवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत.