ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर

ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर, नागपूरचे कमळ मंदिर म्हणून ओळखले जाते, नागपूरच्या कांमठी येथे स्थित बौद्ध मंदिर आहे. 1999 मध्ये ओगावा सोसायटीने जपानमधून दान केलेल्या निधीतुन हे मंदिर अलीकडेच स्थापन करण्यात आले. मंदिरामध्ये बुद्धांची एक मोठी मूर्ती आहे आणि परिसर व्यवस्थितपणे सुशोभित केलेल्या बागांसह आणि एकंदर सौंदर्यदृष्ट्या सुंदरतेने बनवले आहे.

हा विहार सुमारे दहा एकर जागेवर विकसित केलेला आहे. या विहाराच्या बांधकामाला जागतिक पुरस्कार मिळाला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून तयार करण्यात आलेली आहे.