‘बाहुबली’ प्रभास थरकनार बियॉन्सेच्या तालावर!…

बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ हे सुपरहिट चित्रपट देणारा प्रभास याचे चाहते ,प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत.‘साहो’मध्ये प्रभास प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचा डबलडोज देणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचा थेट संबंध हॉलिवूड सिंगर बियॉन्सेशी आहे.

जगात लोकप्रीय असलेल्या बियॉन्सेच्या सुपरहिट गाण्यांवर प्रभास थिरकताना दिसणार आहे.यासाठी ब्राझिलचे स्पेशल डान्सर्स बोलवण्यात आले आहे.बियॉन्सेच्या ‘ब्लो’ आणि ‘जेलेस’ ही गाणी या डान्स ट्रॅकचा भाग असतील.

‘साहो’ ह्या चित्रपटात प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे.