आता महिला लष्कराच्या सैनिकी विभागात दाखवणार शौर्य-संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचा ऐतिहासिक निर्णय 

आता महिलासुद्धा लष्कराच्या सैनिकी विभागात भरती होऊन शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत. महिलांना लष्करातील सैनिकी विभागात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे. महिलांना लष्करामधील सैनिकी विभागात आतापर्यंत प्रवेश दिला जात नव्हता.

महिलांना लष्करामधील वैद्यकीय तसेच इतर काही विभागात प्रवेश दिला जात होता. मात्र प्रत्यक्ष रणांगणाशी संबंधित असलेल्या सैनिकी विभागात आतापर्यंत महिलांना प्रवेश दिला जात नसे. दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी ऐतिहासिक निर्णय घेताना महिलांच्या सैनिकी विभागातील प्रवेशाबाबत असलेला अडथळा दूर केला आहे. आता महिलांनाही लष्कराच्या सैनिकी विभागात सामावून घेतले जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेंतर्गत 20 टक्के महिलांना सैनिकी विभागात प्रवेश दिला जाईल.