२.० सिनेरिव्ह्यू

कलावंत-रजनीकांत,अक्षयकुमार,अॅमी जॅक्सन,आदिल हुसेन,अनंत महादेवन
दिग्दर्शक-एस. शंकर

एक वृद्ध व्यक्ती मोबाइल टॉवरवर गळफास घेऊन आत्महत्या करते, या दृश्यानं ‘२.०’ची सुरुवात होते. नंतर लगेचच संपूर्ण शहरातील स्मार्टफोन यूझरकडून आकाशाच्या दिशेने खेचले जातात. एकाच वेळी संपूर्ण शहरातील स्मार्टफोन गायब झालेले पाहून सरकारी यंत्रणा चक्रावून जाते. नंतर याच स्मार्टफोनपासून बनलेला एक भव्य आक्राळविक्राळ पक्षी शहरावर हल्ला करत. या वेगळ्या संकटाचा सामना करण्यासाठी लष्करही निष्प्रभ ठरल्यामुळे डॉ. वशीकरण (रजनीकांत) आणि त्याची पर्सनल सेक्रेटरी रोबो नीला (अॅमी जॅक्सन) यांना बोलावले जाते.

टेलिकॉम कंपन्यांच्या रेडिएशनमुळे होणाऱ्या पक्षांच्या मृत्यूमुळे अस्वस्थ असलेला पक्षीराजन (अक्षयकुमार) हे या कथानकातील एक महत्त्वाचे पात्र. पक्षी वाचावेत म्हणून धडपडणारी ही व्यक्ती मोबाइल रेडिएशनच्या विरोधात आहे. पक्ष्यांना वाचवण्यासाठी मोबाइल वापरू नये, असे पक्षीराजनचे म्हणणे आहे. सरकारदरबारी भांडूनही टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क वाढत गेल्यामुळे एकूणच स्मार्टफोन वापरणाऱ्यांना त्याचा विरोध आहे. निराशेतून स्वत:चे जीवन संपवणाऱ्या पक्षीराजन यांनी मृत्यूनंतर ‘निगेटिव्ह वेव्हज्’च्या आधारे संपूर्ण मानवजातीवरच सूड उगवण्याचे ठरवले आहे.

 ‘२.०’ हा सारा तंत्रज्ञानाचा खेळ आहे. डोक्याला फार ताण देऊ नये, फार विचार करीत बसू नये. व्हिज्युअल इफेक्टसचा वारेमाप वापर हे या सिनेमाचे वैशिष्ट्य. हे इफेक्टस प्रेक्षकांच्या आणखी अंगावर येण्यासाठी वापरलेले ‘थ्रीडी’ तंत्रज्ञान यामुळे सिनेमा सुरेख दिसतो . प्रेक्षक हा तंत्रखेळ पाहून अक्षरश: थक्क होतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा