या एका क्षणाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले-भाग्यश्री

भाग्यश्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो भाग्यश्रीच्या लग्नातील असून या फोटोत नारंगी रंगाच्या साडीत ती खूपच छान दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, या एका क्षणाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. या तिच्या फोटोला तिच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिले आहेत.

भाग्यश्रीने तिच्या प्रेमकथेविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र. आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते.  मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटांत हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या केवळ एवढेच जण आमच्या लग्नात हजर होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा