प्रयागराजया तीर्थक्षेत्री साजरा होणारा कुंभमेळा!

गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमावरील प्रयागराज या तीर्थक्षेत्री साजरा होणारा कुंभमेळा!

प्रयागराज या ठिकाणी प्रत्येक १२ वर्षांनी भरणारी जत्रा म्हणजेच कुंभमेळा होय. कुंभ परंपरेचा इतिहास सिंधुघाटीच्या संस्कृतीच्या परंपरेपेक्षाही जुना आहे. प्रयागराज तीर्थक्षेत्री गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या पवित्र मीलनाचा संगम आहे. यालाच ‘त्रिवेणी संगम’ असे म्हणतात. वैदिक काळापासून त्रिवेणी संगम हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र त्रिवेणी संगमावर प्रतिवर्षी माघ मासात (महिन्यात) जत्रा भरते. हा ‘माघमेळा’ या नावाने ओळखला जातो. येथेच प्रत्येक १२ वर्षांनी कुंभमेळा आणि प्रत्येक ६ वर्षांनी अर्ध कुंभमेळा भरतो. हे कुंभपर्व प्रत्येक १२ वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी साजरे केले जाते. कुंभमेळा जगप्रसिद्ध आहे.

सहस्रो वर्षांपूर्वीपासूनची परंपरा

 सध्याच्या काळात कुंभमेळा हा विश्वातील सर्वात मोठा मेळा आहे. याचा आरंभ कधीपासून झाला, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. माघ मासातील अमावास्येला स्नान करण्यासाठी संन्यासी या ठिकाणी एकत्र येतात. पौराणिक ग्रंथात कुंभमेळ्याच्या संदर्भात उल्लेख आहे. नारद पुराणात कुंभमेळा अति उत्तम असल्याचे सांगितले आहे.

काही विद्वानांच्या मते ख्रिस्ताब्दपूर्व ३४६४ मध्ये या जत्रेचा प्रारंभ झाला असावा. म्हणजेच हडप्पा आणि मोहेनजोदडो संस्कृतीच्या १ सहस्र वर्षांपूर्वीपासूनची ही परंपरा आहे.

ख्रिस्ताब्दपूर्व २३८२ मध्ये विश्वामित्र द्वितीय यांनी माघ पौर्णिमेला स्नान करण्याचे महत्त्व सांगितले.

ख्रिस्ताब्दपूर्व १३०२ मध्ये महर्षी ज्योतिष यांनी पौष पौर्णिमेच्या स्नानाचे महत्त्व सामान्यजनांमध्ये रुजवले.

चिनी यात्री हुआंगत्संग यानेही आपल्या पुस्तकात कुंभमेळ्याचे वर्णन केले आहे. पुस्तकात ख्रिस्ताब्द ६२९ मधील ‘भारतयात्रेचे वर्णन’ लिहिले आहे. त्यात ‘सम्राट हर्षवर्धनच्या राज्यात प्रयाग येथे हिंदूंचा अशा प्रकारचा मेळा असतो, असा उल्लेख सापडतो.

जगद्गुरू आदीशंकराचार्य यांनी कुंभमेळ्याला वैदिक रूप देऊन प्रतिष्ठा मिळवून दिल्याने विविध साधुसंतांचा कुंभमेळ्यातील सहभाग वाढणे हिंदूंच्या धार्मिक उत्सवाला ख ºया अर्थाने जगद्गुरू आदीशंकराचार्य यांनी भारतीय उत्सवाचे स्वरूप देऊन निरनिराळे धर्म आणि संप्रदाय यांच्या साधूसंतांना यात भाग घेण्यास प्रवृत्त केले. त्यांच्याच प्रेरणेने प्रयाग येथील कुंभमेळ्यात भारतातील निरनिराळे धर्म आणि संप्रदाय यांतील साधूसंतांनी भाग घेण्यास प्रारंभ केला. आदीशंकराचार्यांनी याला वैदिक स्वरूप देऊन प्रतिष्ठा मिळवून दिली. ख्रिस्ताब्द १५१५ मध्ये श्री चैतन्य महाप्रभू बंगालहून या ठिकाणी आले होते. या मेळ्यात जैन, बौद्ध आणि शीख या धर्मांचे अनुयायीही सहभागी होतात. सध्याच्या काळात विविध देशांतील नागरिकही यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

कुंभया शब्दाची व्याख्या कुंभ म्हणजे पवित्रता आणि मांगल्य यांचे प्रतीक असणारा कलश’!

कुंभचा प्रचलित अर्थ ‘घडा’ किंवा ‘कलश’ असा होतो. ‘कलश’ हे पवित्रता आणि मांगल्य यांचे प्रतीक असल्याने याला ‘मंगल कलश’ असेही म्हटले आहे. ज्योतिषशास्त्रात ‘कुंभ’ म्हणजे ‘राशी’ या अर्थाने प्रयोग केला जातो. कुंभपर्वाच्या संदर्भात याचा ज्योतिषशास्त्रीय अर्थच ग्राह्य धरला जातो.

कुंभाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

 कुंभात देवता, समुद्र, पृथ्वी आणि चारही वेद यांचा वास असणे ऋषीमुनी, साधूसंत, ब्राह्मण यांनी या कुंभाचा देवतांचे दिव्य भाव, प्राकृतिक संपदा, भौतिक सुखसमृद्धी, श्री आणि लक्ष्मी यांची कृपा अन् ज्ञान-विज्ञान विद्येचा स्रोत इत्यादींचे प्रतीक मानून सन्मान केला आहे. शास्त्रानुसार कुंभात देवतांचा वास असतो. कुंभाच्या मुखात भगवान श्रीविष्णु, कंठामध्ये श्री महादेव आणि तळाशी श्री ब्रह्मदेव यांचा वास असतो. कलशाच्या मध्यभागात सर्व देवता, सर्व समुद्र, पर्वत, पृथ्वी आणि चारही वेद यांचा वास असल्याचे मानले जाते; म्हणूनच आपल्यासाठी कुंभाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

कुंभाचे पौराणिक महत्त्व

समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशाच्या प्राप्तीसाठी देवासुर युद्ध होणे कुंभासंदर्भाच्या पौराणिकतेत देव आणि असुर यांच्या युद्धाचा इतिहास लपलेला आहे. समुद्रमंथनाच्या वेळी १४ रत्ने मिळाली. त्यात अमृत कलशाचाही समावेश आहे. या अमृत कलशाच्या प्राप्तीसाठीच सुर-असुरांमध्ये युद्ध झाले होते. कुंभपर्वात या अमृत कलशाचेही स्मरण केले जाते.

अनेक प्रकारचे लाभ करून देणारी तीर्थस्थाने तीर्थक्षेत्रांचे महत्त्व वेदांमध्येही वाचायला मिळते.

प्रयाग येथे स्नान आणि दानधर्म करणा ºयांना स्वर्गप्राप्ती होते. अनेक भाविक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सेवा करून, मोठ्या यज्ञांची अनुष्ठाने करून स्वर्गाची प्राप्ती करून घेतात.

तीर्थस्थानांचा आश्रय घेऊन मनुष्य अतिशय अवघड कष्टसुद्धा झेलू शकतो.

तेथील तीर्थ भक्तिभावाने प्राशन केल्यास पापांचे क्षालन होते.

या ठिकाणी स्नान, ध्यानधारणा केल्याने हिमालयातील सिद्ध ऋषीमुनींकडून येणारी ऊर्जा आपल्याला मिळते. त्याचा आपल्याला सर्व स्तरांवर लाभ होतो. तसेच अनेक कष्ट आणि व्याधी यांच्यापासून सुटका होते. आपल्याला चांगले मानसिक स्वास्थ्यही लाभते, असा अनेक जणांचा अनुभव आहे.

भाविकांना चार मुख्य पर्वांचा लाभ करून देणारा प्रयागराज येथील कुंभमेळा

कुंभमेळ्यात मकरसंक्रांत, अमावास्या, वसंतपंचमी आणि माघी पौर्णिमा हे चार मुख्य पर्व आहेत. या दिवसांच्या स्नानाला विशेष महत्त्व असते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा