राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनीता भिंगारदिवे यांचा भाजपात प्रवेश

अहमदनगर – सावेडी उपनगर मधील प्रभाग क्रमांक सात मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनिता भिंगारदिवे, माजी नगरसेवक किसान भिंगारदिवे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत खासदार संपर्क कार्यालय येथे हा पक्षप्रवेश झाला.

यावेळी गटनेते सुवेंद्र गांधी, शहर सरचिटणीस किशोर बोरा, पोपट कोलते, कमल कोलते, संकेत भिंगारदिवे, शरद बारस्कर, दत्तात्रय बारस्कर, साहेबराव काते, बबन गोसकी, राजू भिंगारदिवे, करण सातूरे, राणी भिंगारदिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.ठाकूर म्हणाले, भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारक काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका भाजप स्वबळावर जिंकल्या आहेत. देशात व राज्यात झालेल्या विकासामुळे जनतेने भाजपला मतदान करण्याचे ठरवले आहे.

आता इतर ठिकाणच्या निवडणुकीतील विजया नंतर नगरची महापलिका ही जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय जनता पार्टी निवडणूक रिंगणात उतरत आहे. महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह सर्व पदे भाजपाकडे असतील असे नियोजन केले आहे. खा.दिलीप गांधी यांनी यासाठी उत्कृष्ठ नियोजन केले आहे. इतर पक्षातून भाजपात आलेल्या नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे स्वागत करून त्यांनाही त्यांचाही उचित सन्मान भाजप करत आहे.

खा.गांधी म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रदेश भाजपाकडून ताकद व पाठबळ मिळत आहे. पक्षाने या निवडणुकीत एकहाती सत्ता आणण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने सुरवातीपासूनच प्रचार यंत्रणेमध्ये भाजपाने पुढाकार घेतला आहे. आज मोठ्या प्रमाणात सर्व पक्षांमधून भारतीय जनता पार्टी प्रवेश करण्याची ओढ वाढत आहे. सावेडी उपनगर मधून नगरसेविका सुनीता भिंगारदिवे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत करताना आनंद होत असून, त्यांचा उचित सन्मान करणार आहोत.

यावेळी नगरसेविका सुनिता भिंगारदिवे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकाला न्याय देणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शेवटच्या स्तरापर्यंत विकास नेला आहे. प्रभाग सात मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी, प्रभागाचा विकास होण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खा.गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या विकासाकरता कटिबद्ध आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा