बेहीसाबी संपत्ती प्रकरणी म्हाडाचे माजी उपायुक्तला अटक

नवी दिल्ली : सरकारी सेवेत असताना कोट्यवधींची माया गोळा केल्याचा आरोप असलेला म्हाडाचा माजी उपायुक्त नितीश ठाकूर याला अखेर  करण्यात आली आहे. ठाकूरवर यूएईमध्ये कारवाई केल्याची माहिती काल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
२१ जानेवारी रोजी नितीश ठाकूरला अटक करण्यात आली असून त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यात आल्याचंही शुक्ला यांनी सांगितलं. या आधी २१०६ मध्ये महाराष्ट्र एसीबीने ठाकूरला अटक केली होती. त्यामुळे त्याने जामिनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा जामीन मंजूर करताना ठाकूर याने ठाणे, मुंबई व रायगड जिल्हा सोडण्यापूर्वी न्यायालयाला कळवावे तसेच तपासकामी तपासयंत्रणेला सहकार्य करावे अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या वर्षी नितीशचा भाऊ निलेश ठाकूरला ईडीने चौकशीसाठी अटक केली होती.
नितीशला अटक करण्यासाठी ईडीच्या विनंतीनंतर इंटरपोलने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. २०११ आणि २०१२ मध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा