केडगाव दगडफेक प्रकरणी दिगंबर ढवण कोतवाली पोलिसांसमोर हजर

अहमदनगर- केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर केडगाव शहरात झालेल्या दगडफेक प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमारे ७० जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपी दिगंबर ढवण हे शुक्रवारी (२८) सकाळी कोतवाली पोलिसांपुढे हजर झाले.

केडगाव दुहेरी हत्याकांडाला जवळ जवळ ४ महिने झाली. या घटनेनंतर संतप्त जमावाने दगडफेक करुन शासकीय वाहनाचे नुकसान केले. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारीसह शिवसैनिकावर गुन्हे दाखल झाले. यातील बहुतांश आरोपी हजर झाले आहे. दिगंबर ढवण यांना अटक केल्यानंतर दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा