मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा साखरपुडा इटलीत

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या पिरामल इंटरप्रायजेसचे अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी साखरपुडा होत आहे.आनंद आणि ईशा जुने मित्र आहेत.

इटलीतले लेक कोमो हे स्थळ साखरपुड्यासाठी निवडण्यात आले आहे. स्वर्गाहून सुंदर जागा अशी प्रशंसा लेक कोमो परिसराची नेहमीच केली जाते. याच ठिकाणी दीपिका आणि रणबीर ही बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडीदेखील विवाह बंधनात अडकणार आहे. परदेशात जवळपास तीन दिवस हा साखपुड्याचा समारंभ आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पार पडणार आहेत. या साखरपुड्यासाठी बॉलिवूड कलाकारांची इटलीत उपस्थिती पाहायला मिळाली.

या साखरपुड्यासाठी अनिल कपूर, मनिष मल्होत्रा, जान्हवी कपूर. प्रियंका चोप्रा, सोनम कपूर अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा नवरा निक जोनास याने सगळ्यांचे लक्ष वेधले.तर काळ्या रंगाच्या गाऊनमधली जान्हवी कपूरही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विवाह होणार आहे

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा