प्रीतिपुष्प-उत्कृष्ट सेवाव्रत आत्मशक्ति वाढवते

ह्या पर्व पर्युषणाच्या धार्मिक वातावरणांत आपल्याला चिंतन करायचे आहे की आपण भाषेचा वापर कसा करायचा ? चर्चा कोणती करावी ? कोणती चर्चा टाळावी ? शास्त्रात सांगतिले आहे

उत्तमाध्यात्म चर्चा,

मोहचर्चा च मध्यमा |

अधमा कामचर्चा च,

परचर्चा डधमाधमा ॥

सर्वश्रेष्ठ चर्चा आध्यात्माची असते. आत्मा-परमात्मा-त्याची शक्ति कशी वाढवायची? वगैरे मोहाची चर्चा मध्यम प्रतिची असते. परिवार, प्रियव्यक्ति, प्रियवस्तु वगैरेची चर्चा मध्यम असते. कामभोग-वासनेची चर्चा अधम प्रतिची असते. आणि परचर्चा दुसर्‍यांची पंचाईता करीत बसणे अधमाहून अधम असते.चार प्रकारच्या विकथा सांगितल्या आहेत. स्त्रीकथा वा पुरुषकथा जोडीदार कसा मिळावा? वा कसा मिळाला? ह्याचीच कथा चालते. त्यातच किती वेळ घालवतो आणि विनाकारण पापकर्मांना आमंत्रण देतो. परपरिवाद हे पंधरावे पापकर्म आहे.वादविवाद, चर्चा, कथापुराण करीत रहाणे. दुसरी भक्त कथा दिवसभर खाण्या-पिण्याची चर्चा एकच विषय काय खायचे?आणि काय खाल्ले? तिसरी देश कथा देश कोणता चांगला कोणता वाईट? देश विदेशाची चर्चा करून काय फायदा? आपण तर कर्तुत्व काहीच करु शकत नाही. देशामध्ये परिवर्तन आणण्याची ताकत आमच्यात नाही पण फालतू गप्पा करून इतरांच्या चुका काढीत बसणे हाती पदरी काहीच येत नाही.चौथी राजकथा आपल्या देशातील राजकारणांची चर्चाकरणे सद्सद् विवेकबुद्धि आपल्याजवळ नाही. पण एक दुसर्‍याचे ऐकून विनाकारण राजने त्यांविषयी चर्चा करून राग-व्देष वाढविणे. किती मुर्खपणा आहे?

सोळावे पापकर्म रति-अरति = प्रिय अप्रिय वाटणे. प्रत्येक वस्तु वा व्यक्तिमध्ये आवड-नावड निर्माण करणे. इतरांची चर्चा करून प्रिय-अप्रियतेची भावना वाढविणे. पापाचे गाठोडे वाढविणे आहे. ह्या दोन्ही पापकर्माचं ओझं कमी करायचं असेल तर आठवे पुण्यकर्म आहे. काया पुण्य आपल्या हाताने इतरांना शांति देण्याचे काम करणे. सेवा सुश्रुषा करुन इतरांना आनंद देणे. सेवा कार्य काही सोपे नसते. रोगी व्यक्तिची मानसिकता सांभाळून स्वतः शांति ठेवून सर्व सहन करणे. आनंदी राहून इतरांना आनंद देणे आणि प्रसन्न वातावरण ठेवून सेवा करणे.

नंदीषेण अत्यंत कुरुप, भांडकुदळ, क्रोधी मुलगामातापित्याचे छत्र हरपले मामाने वाढविले. वयात आल्यावरभावना अनावर झाल्या. लग्न करण्यास कुणीच तयार नाही.आत्महत्येच्या भावनेने पहाडावर गेला. उडी मारण्याची हिम्मत होत नव्हती. संतांचे आगमन झाले. त्याची मनस्थिती जाणून घेवून संन्यास घेवून तप-जप-संयमाची-सेवेची प्रेरणा दिली.मरता क्या न करता? त्याने संता जवळ दिक्षा घेतली. आणि कडक तपश्चर्येत स्वतःला झोकून दिले. दोन दिवस निराहार उपवास आणि परण्या च्या दिवशी आयंबिल रुक्ष विना तूप-तेलाचे आहार घेणे. आणि अन्य साधू संतांची मनोभावे सेवेत लागले. तपश्चर्या आणि सेवावृत्ति ह्यात इतके रमले की, वासनेची भावना कुठल्या कुठे लुप्त झाली. त्यांच्या सेवाव्रताची उत्कृष्टता बघून देवलोकांत चर्चा होवू लागली. दोन देवतांनी परीक्षा घेतली. साधू बनून आजारी पडले आणि त्याला सेवेसाठी प्रवृत्त केले. सेवा करतांना त्यांना अतिशय त्रास दिला – घाणेने भरून जात, शिव्या वगैरे देवून उचकवण्यासाठी प्रयत्न करीत पण नदीषेण मुनि इतक्या शांतिने, प्रेमाने, सहनशीलतेने,हसतमुखाने सेवा करुन त्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करु लागले. देवतांना पण नतमस्तक व्हावे लागले.

अशा प्रकारे सेवा करुन विनाकारण इतरांची बरी वाईट चर्चा करणे टाळावी जेणेकरुन कर्मबंधा पासून मुक्ति होईल. त्यासाठी प्रत्येकाने आत्मनिरिक्षण करुन आध्यात्म चर्चेला प्राधान्य देणे -परचर्चा तर पूर्णपणे टाळावी. आत्मशक्तिचा परिचय करावा म्हणजे हे महापर्व साजरा करणे सार्थक होईल.

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अ. नगर