हे करून पहा चेहरा चमकू लागेल

नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन मुरुमे, पुळ्या येत नाहीत.

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. त्यामुळे दिवसभराची चेहऱ्यावर बसलेली धूळ निघून जाते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावा. चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होईल.

त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी लिंबाचा रस 3 ते 4 थेंब घेऊन त्यात चिमूटभर शुद्ध हळद आणि 1 चमचा काकडीचा रस घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. चेहरा चमकू लागेल.

काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होऊन ती मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात.