स्नेहबंधच्या स्वयंसेवकांचे अपंग कल्याण केंद्रात रक्षाबंधन

 

अहमदनगर- समाजातील दुर्लक्षित व दुर्बल समजल्या परंतु मानसिक दृष्ट्या अत्यंत सक्षम व जाणार्‍या संवेदनशील असलेल्या घटकाविषयी जाणीव असलेल्या व त्यांच्यासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे. या भावनेतून प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या प्रेरणेतून अहमदनगर कॉलेज स्नेहबंधच्या २७ स्वयंसेवकानी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून नेप्ती येथील आदर्श ग्रामीण महिला मंडळाचे, राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्र येथे रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला.

स्नेहबंधच्या १३ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले भेटकार्ड व शुभेच्छा देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना राख्या बांधून त्याच्या विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर स्वयसेवकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले. अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनीही स्नेहबंधच्या स्वयंसेवकासाठी मनोरंजन कार्यक्रम सादर केले व ‘आम्हीही’ कमी नाहीत हे दाखवून स्वयंसेवकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. स्वतःच्या घरापासून व पालकापासून सुमारे २५० ते ३०० किलोमीटर दूर असलेल्या आपल्या भावंडाबद्दल स्नेहबंधच्या विद्यार्थीनी दाखविलेल्या जाणीवेबद्दल अपंग कल्याण केंद्राचे संस्थापक रावसाहेब फावरे व मुख्याध्यापक के. टी. बारवकर सर यांनी व्यक्त करून समाधान स्नेहबंधच्या स्वयंसेवकांचे व अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रशासकांचे आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास स्नेहबंधच्या स्वयंसेवकांबरोबर विजय साबळे, प्रा.डॉ. रुपाली दळवी व स्नेहबंधचे समन्वयक डॉ. शरद बोरुडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कमला करभट, प्रोफेसर डॉ. बी. एम. गायकर, उपप्राचार्य. डॉ अरविंद नागवडे ,डॉ.नंदकुमार सोमवंशी व रजिस्ट्रर ए. वाय बळीद यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा