प्रियंका चोप्रा आणि निक यांचे लग्न हवाई बेटांवर?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता निक जोनास अमेरिकेत विवाहबद्ध होणार असल्याचं म्हटलं जात आहे. निकला समुद्र किनारे पसंत असल्यामुळे हवाई बेटावर दोघं लग्नबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत.

निकने ‘जुमांजी’, हवाई 50 यासारख्या चित्रपटांचं शूटिंग हवाई बेटांवर केलं होतं. त्यामुळे निकच्या विशेष आठवणी या जागेशी निगडीत आहेत. हवाईमध्ये त्याचं फेवरिट रिसॉर्टही आहे. त्यामुळे निक आण प्रियंका वेडिंग डेस्टिनेशन म्हणून हवाईची निवड करण्याची शक्यता आहे.

प्रियंका आणि निक यांनी 18 ऑगस्ट रोजी भारतीय पद्धतीने साखरपुडा केला. दोघांच्या लग्नाची तारीखही अद्याप निश्चित झालेली नाही. कोलाहल आणि झगमगाटापासून दूर राहून लग्न करण्याचा दोघांचा मानस आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा