निद्रानाशाचा विकार का होतो?

सकाळची शाळा असली की फार पंचाईत होते.जागच येत नाही. आई-बाबा उठवून उठवून थकतात, पण तुम्हाला उठायचा कंटाळा येतो.सामान्यपणे मुलांनी ७ ते ८ तास झोपायला पाहिजे.झोप येणे हे मेंदूतील निद्रेच्या केंद्रावर अवलंबून असते.

खूप काळजी असली, माणूस विचारात पडलेला असेल; तर झोप लागत नाही. नवीन ठिकाणी झोप येत नाही. अर्थात ही सर्व झोप न येण्याची तात्पुरती वा काही काळापुरतीच कारणे आहेत. मनोविकारांमध्ये वा वर उल्लेख केलेल्या मेंदूंच्या केंद्रावर काही परिणाम झाला, तर निद्रानाशाचा विकार जडतो.

निद्रानाशाचे कारण शोधून त्यावर उपाय करावे लागतात. उच्च रक्तदाब, वेदना ही कारणे असतील;तर त्याप्रमाणे इलाज करावा लागतो. मनाची एकाग्रता वाढविणे, ध्यानधारणा इत्यादी मार्गानीही निद्रानाशावर उपचार करता येतात. यानेही झोप येत नसल्यास शेवटचा उपाय म्हणून तज्ञांच्या सल्ल्याने झोपेच्या गोळ्या घेता येतात.