राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीसपदी बापुसाहेब डोके यांची निवड

अहमदनगर- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व उद्योगपती बापुसाहेब डोके यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षबांधणीसाठी अनेक नविन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यात बापुसाहेब डोके यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली असून तसे पत्रही पाटील यांनी दिले आहे.

प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर शहर उपाध्यक्ष पदांवर काम केले जिल्ह्यात राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्य सुरू केले.डोके यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर व बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक व सामाजिक काम केले, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण चळवळ राबवून यशस्वी केली आहे. सध्या श्री. डोके हे प्रदेश संघटक पदावर कार्यरत होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा