‘सत्यमेव जयते’ला मोठं यश पण केरळमधील परिस्थितीमुळे पार्टी नाही..

जॉन इब्राहिम याचा 15 ऑगस्टला रिलीज झालेला सिनेमा ‘सत्यमेव जयते’ बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. 20.52 कोटींचं कलेक्शन करत सिनेमाने मोठी ओपनिंग मिळवली. तिसऱ्या दिवशी सत्यमेव जयतेने 9.18 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने आतापर्यंत 37.62 कोटींची कमाई केली आहे.A सर्टिफिकेटच्या सिनेमाने इतकी कमाई करणे ऐतिहासिक आहे.

हा सिनेमा इतका हिट ठरल्यानंतर ही जॉनने पार्टी करण्यास नकार दिला आहे. यामागचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जॉनने म्हटलं की, ‘इंडस्ट्रीमध्ये मला प्रत्येक जण विचारतोय की सक्सेस पार्टी कधी आहे. पण माझा असा कोणताही प्लान नाही आहे. केरळमध्ये सध्या परिस्थिती खूप बिकट आहे. माझं कुटुंब देखील केरळमध्ये आहे. लाखो लोकं संकटात आहे. यामुळे मी पार्टीच्या विचारात नाही. सध्या मी गुलमर्गमध्ये सिनेमाचं शूटींग करत आहे.’

जॉनने सिनेमाला दिलेल्या प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.