रणवीर नाही तर रणबीर कपूरसोबतचा फोटो दीपिकाकडून शेअर

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र दीपिकाने नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांना बुचकळ्यात टाकत आहे. कारण दीपिकाने रणवीर सिंगचा नाही, तर अभिनेता रणबीर कपूरचा फोटो शेअर केला आहे.

जागातिक छायाचित्रण दिवसाच्या निमित्ताने दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे ‘तमाशा’ चित्रपटाच्या शूटिंगवेळचा. कोर्सिकामध्ये शूट केलेल्या या फोटोमध्ये रणबीर पोझ देताना दिसतो, तर दीपिका त्याचा फोटो क्लिक करत आहे.

सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट डेट करत आहेत. तर दीपिका आणि रणवीर सिंग 20 नोव्हेंबरला लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या दोघंही नव्या नात्यात गुंतलेले असताना दीपिकाने आपल्या ‘एक्स’सोबत फोटो पोस्ट करणं काहीसं आश्चर्यकारक आहे.

तमाशापूर्वी दीपिका आणि रणबीर यांनी ‘बचना ऐ हसीनों’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. 2007 मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची भेट झाली होती. 2008 साली ‘बचना ऐ हसिनो’च्या सेटवर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र एके दिवशी दीपिकाने बॉयफ्रेण्डला एका तरुणीसोबत रंगेहाथ पकडलं आणि नात्याची घडी विस्कटली.