साक्षी बना, निर्णायक नव्हे

तुम्ही एका दिवसासाठी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही की, कोणाकडून काही काम करूनच घ्यायचे असेल, न रागवता, न चिडचिड करता, करून घेणे पक्के ठरवा अगोदर, आज काहीही होवे मला स्थिर रहायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मला बेचैन व्हायचे नाही आणि मग तुमच्या लक्षात येईल की-अरे! हे तर फार सोपे आहे, यापुर्वीच मी का नाही असे वागलो ?

समजा आपण रहदारीत (ट्राफीकमध्ये) अडकलो आहोत तेव्हा आपले कोणत्या प्रकारचे संकल्प सुरू होतात ? हे काय चालले आहे ? कोणी कुठेही घुसतो, यांना लायसन्स कोण देतो ? हे असेच होत रहाणार का ? असे संकल्प आपले सूरू होतात. मला हे फक्त एक दिवस करायचे नाही, काहीही होऊ दे. फक्त एक दिवस शांत रहायचे आहे, बेचैन व्हायचे न्ही. स्थिर रहायचे आहे. यासाठी काही विधी वगैरे शिकण्याचीही आवश्यकता नाही फक्त जागृत रहायचे की मला आज स्थिर रहायचे आहे. चिडायचे नाही.मग खात्रीने तुमच्या लक्षात येईल की, अरे यामुळे तर खूप बचत झाली ऊर्जेची.

ही स्थिरताच आम्हाला किती सामर्थ्य देते,किती ऊर्जा देते, उत्साह देते. किती तरी गोष्टी करण्याचे बळ देते आणि हे सर्व जेव्हा आपण प्रयोग करू तेव्हाच लक्षात येईल आणि हा प्रयोग स्वतःसाठी करायचा आहे, त्यातून जो काही अनुभव येईल, ज्या कशाची आपणांस प्रगती होईल त्यात सर्वांना सहभागी करून घ्या.

ब्रह्मकुमारी शिवानी, जेव्हा सर्व आम्ही केले तेव्हा त्याचे महत्व लक्षात आले. परंतु एक गोष्ट अशी की जेव्हा आम्ही मौनात असतो तेव्हा त्याची गहनता आमच्या अंतर्मनामध्ये उतरते, तेव्हा त्याचा प्रभाव जास्त असतो.

(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्र्वरीय विेश्व विद्यालय)