कोट्यवधीचे कर्ज घेऊन फसवणूक करणारा विजय माल्ल्या आता पुरता अडकला…

कर्जबुडव्या विजय माल्ल्या आता पुरता अडकलाय. भारताने लंडन महादंडाधिकारी न्यायालयात सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरलेत.

माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी गेल्या वर्षभरापासून भारताकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भारतीय बॅंकाची कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली आहे .

कर्जबुडव्या विजय माल्ल्या आता पुरता अडकलाय. माल्या २०१५ पासून इंग्लंडमध्ये वास्तव्य करुन आहे.भारताने लंडन महादंडाधिकारी न्यायालयात सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरलेत. त्यामुळे सीबीआयची न्यायालयातील बाजू भक्कम झालीय. भारताने प्रत्यर्पणाविषयी लंडन न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा आज निर्णय अपेक्षित आहे. त्यासाठी सीबीआयचं पथक लंडनमध्ये आहे. निर्णयाविरोधात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा आहे.

दरम्यान, विजय माल्या याला भारतात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात. आज याबाबत युक्तीवाद झाला. १२ सप्टेंबर नंतर निर्णय द्यायचा की नाही हा निर्णय न्यायाधीश ऐनवेळी घेणार आहेत.

दरम्यान, माल्लाला आर्थर रोड जेलमध्ये बॅरक क्रमांक १२ मध्ये ठेवले जाणार आहे. दरम्यान, लंडन न्यायालयाने जेलचा व्हिडिओ सादर करण्यास सांगितले आहे. माल्लाला कसे ठेवले जाईल. त्याला काय सुविधा दिल्या जातील हे लक्षात घेऊन न्यालायल माल्याच्या प्रत्यार्णणबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा