पद्मशाली समाजाचा ३ ऑगस्टला बागुला पंडुगू (बागेचा) सण

अहमदनगर- सालाबादप्रमाणे आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या नंतर येणार्‍या शुक्रवारी पद्मशाली समाजाच्या रूढी परंपरेनुसार बागुला पंडगू साजरा करण्यात येतो. यंदाच्या शुक्रवारीच आषाढ पौर्णिमा आलेली असल्याने शुक्रवारी म्हणजेच दि. ३ रोजी नगरमध्ये बागुला पंडगू(बागेचा सण) साजरा होणार आहे.

या दिवशी लक्ष्मी आई(यल्लम्मा) व शितळा देवी(पोशम्मा) या देवींची षोडशोपचाराने पुजा विधी केला जातो.

देवींना लिंबाचा पाला व गार पाण्याने अभिषेक करण्याचेही परंपरागत प्रथा आहे. त्यानंतर दही भात,गोड पुरी, फुटाणे, ओवा वगैरेंचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरागत प्रथा आहे.दुपारनंतर या देवींची सवाद्य मिरवणूक काढली जाते.

पूर्वीच्या काळी गावाबाहेर निसर्गरम्य परिसरात सहकुटुंब भोजनास जाण्याची प्रथा होती. मात्र गेल्या अनेक वर्षापासून सर्वसमाज बांधव आपआपल्याघरीच सहकुटुंब-मित्र परिवारासह भोजनाचा आनंद घेतात.यादिवशी रोगराई न होवो व सर्वांना अवोग्य संपन्न सुखसमृद्धी प्रापत करुन देया प्रकारची प्रार्थना देवीला मनोभावे केली जाते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा