ग्रीन व्हॅली प्री स्कुलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

अहमदनगर- विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठलचा जयघोष करत संस्कार ग्रीन व्हॅलीच्या लहानग्यांनी दिंडी काढून परिसरातील लोकांचे लक्ष वेधले. वारकर्‍यांच्या पोशाखात कढेवरी हात ठेवून निघालेल्या चिमुकल्यांसमोर भाविक नतमस्तक होत होते.

मुलांमधील उपजत गुणांना वाव मिळवून देणारे आणि भारतीय संस्कृती शिकवणारे ग्रील व्हॅली प्री स्कुल नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करते. शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या या वारीची परंपरात्यातून मिळणारी उर्जा आदी गोष्टीबाबत मुलांना सविस्तर माहिती देऊन आषाढीचे राज्याच्या संस्कृतीतले महत्वही त्यांना सांगण्यात आले.

किर्लोस्कर कॉलनीपासून सुरू झालेलीही वारी गुलमोहोर रोडवरुन पुन्हा ग्रील व्हॅली प्री स्कुलमध्ये आणण्यात आली. वारकर्‍यांचे पोशाख परिधान केलेली चिमुकली मंडळी,विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठलाचा सुरू असलेला जयघोष, टाळ मृदुंगांचा आवाजयामुळे रस्त्यावरुन जाणारे-येणारेही काही क्षण थांबूनया चिमुकल्यांचे कौतुक करत होते. वारी परतल्यावर प्रसादाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उमंग नंदा,शिक्षिका सौ. सोनाली कांबळे, सौ. पल्लवी इंगळे, सौ.आश्‍लेषा चित्ते आदींनी दिंडीसाठी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा