जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार-शाळा, संस्थाचालकांचे प्रशानाला निवेदन

अहमदनगर – विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि पालकांच्या भावना विचारात घेऊन 17 फेब्रुवारीपासून नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)ने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील संपूर्ण शाळा सरसकट 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज् असोसिएशन मेस्टा संघटनेने तात्काळ संस्थाचालकांची 11 व 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा पातळीवर बैठका बोलवल्या होत्या. या बैठकीमध्ये गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सबबीखाली मुलांचे मोठ्या प्रमाणात झालेले शैक्षणिक व भावनिक नुकसान तसेच पालकांची शाळा बंद न करण्याची आग्रहाची मागणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्वानुमते कोरोना रुग्ण नसलेल्या भागात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत पालकांच्या संम्मती घेऊन व शाळा निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .

जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोवीड-19 संदर्भातील सावधगिरीचे सर्व नियम पाळून सुरु ठेवण्यात याव्या व विद्यार्थ्यांचं आधीच प्रचंड झालेले नुकसान पुन्हा होऊ न देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. शाळा बंद न करण्यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्याचे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले. आज या बैठकांमध्ये घेतलेल्या या निर्णयाला पाठिंबा देत 17 जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील संस्थाचालकांनी इंग्रजी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील, प्रसिद्धी प्रमुख सचिन मलिक यांनी दिली आहे. यावेळी ऍड. एस. बी. महाले, ऍड. सुनील पालवे, सुनील लोटके, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा विजय शिंदे, कार्याध्यक्ष, अहमदनगर शहर व तालुका, यश शर्मा, सचिव, अहमदनगर शहर, सौ. जयश्री मेहेत्रे, आदर्श धोरजकर, अध्यक्ष, नगर तालुका, देविदास गोडसे, अंतरप्रित धुप्पड आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा