सीएसआरडी महाविद्यालयाच्या समोरून उच्चदाब विद्युत वाहिन्या खांबावरून नेणे धोक्याचे

गैरसोयीच्या ठरत असलेल्या बाबीमध्ये लक्ष घालण्याचे आ.संग्राम जगताप यांचे आश्वासन

अहमदनगर – आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच सीएसआरडी महाविद्यालयास भेट दिली व सीएसआरडी समोर सुरु असलेल्या उड्डाणपूल बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सीएसआरडी महाविद्यालयाचे कर्मचारी व माजी विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून उड्डाणपूल बांधकामाच्या अनुषंगाने महाविद्यालयास येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या.

सक्कर चौक ते अशोका हॉटेल यादरम्यान होत असलेल्या उड्डाणपूलाचे काही काम सीएसआरडी महाविद्यालयाच्या दर्शनी भागातील जागेत होत आहे. या परिसरात सदर उड्डाणपुलाचे चौपदरीकरण सुरु आहे, जामखेड वरून येणार्‍या वाहनांना उड्डाणपुलावर जाण्यासाठी व पुण्यावरून येणारी वाहने उतरण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र पिलर याठिकाणी उभारण्यात येत आहेत. यामुळे यासाठी मोठ्या प्रमाणात जागा अधिग्रहित करण्यात आली आहे, तसेच सीएसआरडी महाविद्यायाच्या मुख्य इमारतीलाच लागून विजेची HT (हाय टेंशन) वायर खांबावरून समोरूनच टाकण्यात आलेली आहे. उच्चदाब विद्युत वाहिन्या खांबावरून नेणे धोक्याचे असल्याने त्या जमिनीखालून न्याव्यात, असे महाविद्यालयाने वेळोवेळी वीज पुरवठा मंडळास कळविले होते. त्यानुसार वीज पुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता यांनी तसे करण्याचे मान्यदेखील केले होते. असे असूनदेखील वीज पुरवठा मंडळाने सदर विद्युतवाहिन्या जमिनीखालून नेण्याऐवजी खांबावरून टाकल्या आहेत. सीएसआरडी महाविद्यालयाच्या आवारात समाजकार्य महाविद्यालय व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय अशा दोन संस्था आहेत. त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थांच्या इमारतीजवळून उघड्या विद्युततारा नेल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात धोका होवू शकतो, यासाठी अन्यत्र व्यवस्था केल्याप्रमाणे इमारतीजवळून जाणार्‍या उच्चदाबाच्या तारा जमिनीखालून नेणे योग्य होईल व संभाव्य धोके टळतील. त्या अनुषंगाने आ.जगताप यांनी प्रत्यक्ष भेट देत सदर कामाची पाहणी केली. सदर उच्चदाब विद्युत वाहिन्या जमि नीखालून न्याव्यात याबाबत संबंधित अधिकार्‍यांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या असून याप्रश्नी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून लवकरात लवकर आवश्यक तोडगा काढण्याचे आश्वासन आ. जगताप यांनी यावेळी दिले. यावेळी सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, आयएमएस महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ.विक्रम बार्नबस, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांच्यासह सीएसआरडी महाविद्यालयाचे कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा