सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत करा- अन्यथा ‘त्या’ पाट्या काळ्या करणार-1 फेब्रुवारीपर्यंत मुदत- मनसेचा इशारा

अहमदनगर- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व दुकानांवरील, आस्थापना तसेच हॉस्पीटल, मोबाईल कंपनीचे जाहिरात फलक पाट्या हे दुकानावरील वरील मोठ्या व ठळक मराठी भाषेत असाव्यात असे आदेश काढण्यात आलेले आहेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळपास पंधरा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत अनेक वेळा आंदोलनही केलेले आहे. या आंदोलनाला कुठेतरी आज यश येताना दिसत आहे तरी देखील नगर शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स, हॉस्पिटल इतर सर्व आस्थापना तसेच जाहिरातदार मोबाईल कंपन्या व इतर कंपन्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये नसून इंग्रजी भाषेत आहेत त्यामुळे या सर्वांनी आपल्या पाट्या मराठीत ठळक व मोठ्या अक्षरात कराव्यात असा इशारा मनसेच्या नितीन भुतारे यांनी दिलेला आहे. जर येणार्‍या पंधरा दिवसात शहरातील पाट्या मराठीत झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी गाठ आहे त्या सर्व पाट्या या मनसेच्या वतीने करण्यात येतील आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान असावा व आपण स्वाभिमानाने त्या पाट्या मराठीत कराव्यात व गर्वाने मराठी भाषेचा गौरव आपण करावा असे आवाहन मनसेचे नितीन भुतारे यांनी अहमदनगर शहरातील दुकानदार व मोबाईल कंपन्या इतर सर्व सभासदांना केले आहे.

महाराष्ट्रात मराठीसाठी आपल्याला भांडावे लागत आहे. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव करावा मराठी भाषेचा प्रसार व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार पावले उचललेली आहेत तरी आपणही एक मराठी नागरिक मराठी अभिमान आपण सर्वांनी या राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व आपल्या दुकानांवरील हॉटेल्स वरील मोबाईल दुकानांवरील तसेच इतर सर्व आस्थापना हॉस्पिटल खाजगी क्लासेस शाळा या सर्वां वरील पाट्या मराठीत कराव्यात याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1 फेब्रुवारी नंतर पंधरा दिवसानंतर ज्या सर्व पाट्या मराठीत नसतील अशा सर्व पाट्या काळ्या करण्याचं काम करणार आहे. मराठीला विरोध करणार्‍यांना आम्ही धडा शिकवू असा ईशारा देखील नितीन भुतारे यांनी दिला आहे. हे आंदोलन मनसेच्या वतीने एक फेब्रुवारी नंतर हाती घेण्यात येईल याची सर्व दुकाने, हॉटेल, मोबाईल कंपनी, शाळा, खाजगी क्लासेस, हॉस्पिटल तसेच इतर सर्व आस्थापना यांनी याची नोंद घ्यावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा