पतंग उडविताना धार्मिक गाणे लावल्याच्या कारणावरुन भिंगारमध्ये शिवीगाळ, दमदाटी- गुन्हा दाखल, दोघांना अटक

अहमदनगर- मकरसंक्रांती सणानिमित्त घराच्या छतावर पतंग उडविताना धार्मिक गीत काय लावले? असे म्हणत घरात घुसून स्पिकरचे केबल फेकून दिल्याप्रकरणी तिघांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.14) भिंगार परिसरातील आलमगीर येथे घडली. शोएब व सोहेल (जुडवा), आणखी एक जण अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभावती दशरथ मुंडे (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर रोड, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची दोन मुले घराच्या छतावर पतंग उडवित होते. पतंग उडविताना त्यांनी धार्मिक गीत लावले होते. दरम्यान सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शोएब व सोहेल यांच्यासह आणखी एक अनोळखी मुलगा असे तिघे घरात घुसले. घरातील जिन्याच्या पायर्‍या चढून छतावर जात होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता ते धक्का देवून जिन्याने छतावर गेले. तेथील स्पिकरचे केबल तोडून त्यांनी फेकून दिले. मुलगा वसंत दशरथ मुंडे यास पुन्हा स्पिकर लावू नको, असे म्हणत शिवीगाळ करुन निघून गेले. या घटनेमुळे आलमगीर परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

या संदर्भात प्रभावती मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शोएब व सोहेल यांच्यासह तीन अनोळखी जणांवर भादंवि कलम 452, 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटनेप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि.14) रोजी आलमगीर येथून शोएब अन्सार मोमीन आणि सोहेल अन्सार मोमीन या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सपोनि शिशीरकुमार देशमुख, पो.नि. सतिश शिरसाठ, पो.कॉ. द्वारके, पो. कॉ. खेडकर, पो.कॉ. नगरे, पो.कॉ. आडसुळ, पो.कॉ. वराट, पो. कॉ. मोरे, पो.कॉ. कुलांगे आदींनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा