महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

भिंगार- सौ. अंकिता ओंकार वाघस्कर (रा.रामकृष्ण बंगला, हनुमान मंदिरासमोर, वडारवाडी, भिंगार) या त्यांची मैत्रिण योगिता धस यांच्या स्कुटीवर घरी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरुन आलेल्या 2 मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे मणी मंगळसूत्र तोडून चोरुन नेले. हा चोरीचा प्रकार 14 रोजी दुपारी 2.45 वा. विटभट्टी, देवी रोड, केडगाव जवळ घडला. कोतवाली पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. 394 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे चोरट्यांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर घटनास्थळी शहर उपअधीक्षक अनिल कातकडे, पो.नि. संपत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा