नियोजनबद्ध विकास कामामुळेच उपनगराचा विस्तार झपाट्याने-आमदार संग्राम जगताप

सोनानगर चौक ते रासने नगर चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ

(छाया – लहू दळवी,अहमदनगर)  

अहमदनगर- उपनगराचा विकास कामांना नियोजनबद्ध चालना दिल्यामुळे या भागाचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच विकास कामांना चालना देता येते. सोना नगर चौक ते रासने नगर चौकापर्यंतच्या रस्ता परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर कुठेही अतिक्रमण न केल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्याच्या कामाला अडथळा आला नाही त्यामुळे रस्त्यांची दर्जेदार कामे मार्गी लागत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. शहर विकासामध्ये नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करून मार्गदर्शन करावे आकाशवाणी सेंटर ते भिस्तबाग चौक ते महाल पर्यंतचे रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागेल नगर शहरातील पहिला रस्ता असा असेल की, रस्त्यावरील विद्युत तारा जमिनीअंतर्गत घालण्याचे काम केले. याच बरोबर पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, शीलाविहार रोड, तारकपूर रोड सह आदी रस्त्यांची कामे लवकरच सुरु होऊन मार्गी लागतील असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

सोना नगर चौक ते रासने नगर चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम, माजी नगरसेवक तायगा शिंदे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, भाजपाचे सावेडी मंडल अध्यक्ष सतिष शिंदे, विलास मडके, भास्कर ढानके, शिवाजी साबळे, मोहन कूल्लाळ, कृष्णराव तनपुरे, मदन छप्पनिया, अनिल जगताप, टी. एम. महाजन, संतोष लोहार, सार्थक लोहार आदी उपस्थित होते. तायगा शिंदे म्हणाले की, दर्जेदार विकास कामे व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत विकास काम करत असताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्यक्रम दिला जातो, आ. संग्राम जगताप यांच्या निधीतून आमच्या प्रभागांमध्ये विकास कामे सुरू आहे. प्रभागात दर्जे दार विकास कामे व्हावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे केली जात आहे, असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा