खगोलीय, आरोग्यदायी, गोडवा सांगणारी संक्रात

संक्रांत वर्षातला (इंग्रजी कॅलेंडर) पहिलाच गोडवा व आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारा सण. विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात अनेक राज्यांत नानाविध नावाने व प्रकाराने हा सण साजरा होतो. आपापल्या क्षेत्रात येणारे ‘सिझनल’ निगडीत खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा, एकम ेकांशी गोड बोलून स्नेहभाव व वाढवा हा संदेश देणारा हा सण आबालवृद्धांना ‘पतंगांच्या’ माध्यमातून सर्व शक्तीमान देवाच्या अनंत आभाळाकडेही पाहायला शिकवतो जणू!

या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. आध्यात्मिक दृष्ट्या स्वर्गप्राप्ती देणारा ‘उत्तरायण’ या दिवसापासून सुरू होतो. खरं तर आज शुभसंक्रांत म्हणू नये. त्याचा अर्थ तुमचे वाईट होतांना आम्हांस आनंद आहे असे होते. (प्रदूषित, स्वार्थी सामाजिक, राजकीय जीवनता याही सुप्त इच्छा असतातच म्हणा.) आपणा सर्वांवरील संक्रांत टळो, कोरोना व्हायरस, तापदायक काळ व त्रास नाहीसा होऊन शांती, सामंजस्य समाधान वाढो याच शुभकामना.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा