होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये ‘कोव्हिड’साठी अर्सेनिक अल्बम 30 चे वितरण सुरू

अहमदनगर – आयुष मंत्रालय, राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोग नवी दिल्ली यांचे सूचनेनुसार कोव्हिड 19 चा संसर्ग टाळण्यासाठी होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत अर्सेनिक अल्बम 30 चे वितरण करण्याच्या सूचना होमिओपॅथिक महाविद्यालयांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर होमिओपॅथिक शिक्षण संस्थेचे अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, सावेडी रोड, नगर येथे सुविधा उपलब्ध असल्याची माहिती अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य व रुग्णालयीन अधिक्षक डॉ. सुनील पवार यांनी दिली.

अहमदनगर शहरातील व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले, उपाध्यक्ष भूषण चंगेडे, खजिनदार डॉ. विलास बी. सोनवणे, सचिव डॉ. डी. एस. पवार, सहसचिव लक्ष्मीनिवास सारडा, संचालक आर. एस. बोरा, अभय मुथ्था, शिवाजी रणसिंग, डॉ. समीर होळकर, राजेंद्र मेहेत्रे, डॉ. ऋतुजा चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार व आरएमओ डॉ. माधुरी मोरे यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा