भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश-1 विद्यार्थी राज्याच्या तर 45 विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत

अहमदनगर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कार गिरवले सुभाष या विद्यार्थ्याने राज्याच्या गुणवत्ता यादीत एकोणीसवा क्रमांक पटकाविला. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत परीक्षेत (इयत्ता पाचवी) वीस विद्यार्थी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) पंचवीस विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना वैशाली मेहेर, अतुल बोरुडे, बी. एन. पालवे, मनिषा कांबळे यांचे तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रगती बेगडे, दिपेश ओस्तवाल, आर. व्ही. कुलकर्णी, शिल्पा नगरकर या अध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृती परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या अध्यापकांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, शाळेचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमिल, पर्यवेक्षक दत्तराज हडप, बेबीनंदा लांडे, रावसाहेब बाबर यांनी अभिनंदन केले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मधील जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी- आर्यन दहातोंडे, गुंजन गोले, स्वामिनी दहातोंडे, प्राजक्ता सैंदाणे, धनराज शेळके, ओम मिसाळ, चैतन्य शिंदे, प्रणील नागरगोजे, अनुजा गर्जे, रुद्रावर्त देशपांडे, आर्या निक्रड, श्‍लोक कार्ले, शुभंकर येवलेकर, श्रेया कार्ले, यशवर्धन घोडके, रोहित तांबोळी, प्रणिती ठाणगे, प्रथमेश भांबरे, आयुष गांधी, श्रेया तळेकर, समृद्धी पावसे, मानस सप्तर्षी, अक्षरा मंगलारम, शिवतेज शिंदे, अनुष्का जाधव. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीमधील जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीतील उत्तीर्ण विद्यार्थी- संस्कार गिरवले, निखिल सत्रे, प्राची जाधव, सृष्टी कराड, अर्पिता निकम, वैष्णवी तरटे, सायली कानडे, प्रणव दहातोंडे, प्रथमेश जाधव, आयुष खिलारी, कृष्णा लगड, आदित्य निकम, कस्तुरी दुधलमल, ऋचा मानूरकर, प्रताप रसाळ, वैष्णवी मेहेत्रे, अंजली कदम, श्रद्धा काकडे, आयुष वाघ, दिशा लोंढे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा