भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर भद्रे यांची निवड

अहमदनगर- भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या जिल्हा अध्यक्षपदी सुधीर भद्रे यांची निवड केल्याचे पत्र अण्णा हजार यांनी दिल्याची माहिती जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन यांनी दिली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदेालनामार्फत भावी काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी धोरणात्मक परिवर्तनाची लढाई जनसामान्यात रुजवण्यास्तव सुधीर भद्रे यांनी प्रयत्न करावेत. त्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या सर्व धोरणांचा अभ्यास करुन त्यातील दोष दुरुस्त करुन जनसामान्यांच्या हितासाठी ही धोरणे उपयुक्त ठरतील यासाठी प्रयत्न करावा. संविधानातील मार्गदर्शक तत्वानुसार नवीन कायद्यांची निर्मिती होण्यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक तक्रारींचे निवारण करणारी निस्पृह कार्यकर्त्यांची यंत्रणा निर्माण करावी. भ्रष्टाचार होण्यापूर्वीच प्रतिबंधक कार्य करणारे सजग कार्यकर्ते घडवावेत. जनतेला कायद्याची साक्षरता होण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत. यासोबतच शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवणारी सक्षम संघटना अहमदनगर जिल्ह्यामध्ये बांधून निवडणूक सुधारणा तसेच शेतकरी संरक्षण कायदा, लोकायुक्त कायदा व जनसामान्यांच्या हितासाठी इतर कायदे होण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सब्बन यांनी व्यक्त केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा