देशपातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेत नगरच्या दादा शिंदेचे यश

अहमदनगर – तेलंगना येथे झालेल्या मिस्टर इंडिया 13 व्या राष्ट्रीय स्पर्धेत अहमदनगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचा खेळाडू 80 किलो वजनी गटात पाचवा क्रमांक मिळवून नगरचे नाव देशपातळीवर चमकावले. स्पर्धेसाठी डॉ.समर रणसिंग, अक्षय कर्डिले, पै.अफजल शेख यांनी दादा शिंदे यांना मोलाचे सहकार्य केले. दादा शिंदेच्या यशाबद्दल त्यांचे जिल्हा शरीर सौष्ठव असोसिएशनचे संस्थापक मधुकर गायकवाड, अध्यक्ष जितेंद्र भिंगारदिवे, मनोज गायकवाड, सचिव डेव्हीड मकासरे, पॉवर लिफ्टिंग असो.चे मयुर दरंदले, सतीश रासकर, कैलास रणसिंग, अजित गायकवाड, सुरेंद्र बोराडे, प्रतिक पाटील, राहुल कुलकर्णी, राहुल पैलवान, शब्बीर अन्सार सय्यद, हनिफ शेख, सागर शिंदे, सुरज पर्वते, अक्षय कांबळे, किशोर वारे, कोच सौरभ बल्लाळ व संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा