वृत्तपत्र वाचनाने ज्ञानात भर पडण्यास मोठी मदत-दत्ता जाधव

सचिन गोरे मित्र मंडळाच्यावतीने न्यू टिळक रोड येथे वाचनालयाचा शुभारंभ

अहमदनगर – आजच्या डिजिटल माध्यमातही वृत्तपत्राचे महत्व कायम आहे, प्रत्येकाला सकाळी पेपर वाचल्याशिवाय करमत नाही. ज्येष्ठांबरोबरच विद्यार्थ्यांनामध्येही वाचनाची निर्माण होणे आज गरजेचे झाले आहे. तेव्हा प्रत्येक भागात वृत्तपत्र वाचनालय निर्माण होण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांचे प्रतिबिंब हे वृत्तपत्रातून वाचनास मिळत असल्याने आपल्या ज्ञानात भर पडण्यास मोठी मदत होत असते. सचिन गोरे मित्र मंडळाने नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करुन दिलेल्या वाचनालयामुळे चांगली सोय निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन, दत्ता जाधव यांनी केले.

सचिन गोरे मित्र मंडळाच्यावतीने न्यू टिळक रोड येथील वाचनालयाचे उद्घाटन महात्मा समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बाळासाहेब माळी, सचिन गोरे, अमोल रणसिंग, दिनेश घेवर, गणेश औशिकर, आदेश जाधव, रवी जाधव, सुरेश पटेल, राहुल यादे, दादा यादे, कौशिक पटेल, अक्षय गोंधळे, स्वप्नील घाटी, महेंद्र वारुळे, शरद कोके, सुरज जाधव, ऋषीकेश जाधव, विशाल गायकवाड आदि उपस्थित होते. सचिन गोरे म्हणाले, वाचनाची आवड सर्वांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी अनेक मान्यवरांचे मत आहे. वाचनातून माहितीचा खजीना मिळत असल्याने प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. यासाठीच या भागात वृत्तपत्र वाचनालय सुरु करुन वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल रणसिंग यांनी केले तर आभार बाळासाहेब माळी यांनी मानले. या भागात वाचनालयाच्या सुविधा निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा