गुणवत्ता व हायजिनकडे लक्ष दिल्यास चांगला ब्रॅण्ड तयार होवू शकतो-दिपाली बिहाणी

रोटरी सेंट्रलच्यावतीने महिलांसाठी पाककृती प्रशिक्षण व प्रात्यक्षिक उपक्रम

अहमदनगर – महिलांनी काळानुरुप आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बचत गटांच्या माध्यमातून महिला खास पाककृती तयार करुन त्याचे प्रभावी मार्केटिंग करू शकतात. पदार्थ तयार करताना उच्च गुणवत्ता, हायजिनकडे लक्ष दिल्यास चांगला ब्रॅण्डही तयार होवू शकतो. महिला सक्षमीकरणासाठी रोटरी सेंट्रल राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन टिव्ही फेम शेफ दिपाली बिहाणी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्यावतीने महिला बचत गटातील महिलांसाठी पाककृती प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिपाली बिहाणी यांनी विविध पदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. गुलमोहोर रोडवरील प्रिया जानवे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमावेळी सेक्रेटरी डॉ.दिलीप बागल, असिस्टंट गव्हर्नर इलेक्ट गीता गिल्डा, खजिनदार धीरज मुनोत, स्वाती गुंदेचा, नितिका गुप्ता, डॉ.निलम बागल, फर्स्ट लेडी मिनल बोरा आदी उपस्थित होते.

यावेळी महिलांना जॅम जेली, विविध प्रकारची लोणची बनविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच लिखित रेसीपीही देण्यात आली. आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ कशी मिळवायची, मार्केटिंग कसे करायचे याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. रोटरी सेंट्रल क्लबचे अध्यक्ष ईश्वर बोरा म्हणाले की, महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण हे ध्येय समोर ठेवून रोटरी सेंट्रल व्यापक उपक्रम राबविणार आहे. आताच्या काळाची ही सर्वात मोठी गरज आहे. महिला स्वयंपूर्ण बनली तर कुटुंबही आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. प्रास्ताविक स्वाती गुंदेचा यांनी केले. डॉ. दिलीप बागल यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा