अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये 17 ते 22 जानेवारी दरम्यान मूळव्याध या विकारावर तपासणी व उपचार शिबीर

अहमदनगर – अहमदनगर होमिओपॅथिक शिक्षण संस्थेचे अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, सावेडी रोड, नगर येथे 17 ते 22 जानेवारी दरम्यान सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत मूळव्याध या विकारावर मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य व रुग्णालयीन अधिक्षक डॉ. सुनील पवार यांनी दिली. या शिबिरामध्ये मूळव्याध या विकारावर सर्व रुग्णांची मोफत तपासणी व उपचार डॉ. सुनील पवार, डॉ.सौ. विद्या देशमुख, डॉ. माधुरी मोरे. डॉ. संकेत लांडे हे करणार असून, आजार बरा होईपर्यंत सर्वांना दर आठ दिवसाला मोफत होमिओपॅथिक औषधे देण्यात येतील. तसेच गरजेनुसार ईसीजी, रक्त, लघवी व सोनोग्राफी व एक्स रे ची तपासणी करून, या तपासण्यांवर 30 टक्के सवलत दिली जाईल.

अहमदनगर व परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले, उपाध्यक्ष भूषण चंगेडे, खजिनदार डॉ. विलास बी. सोनवणे, सचिव डॉ. डी. एस. पवार, सहसचिव लक्ष्मीनिवास सारडा, संचालक आर. एस. बोरा, अभय मुथ्था, शिवाजी रणसिंग, डॉ. समीर होळकर, राजेंद्र मेहेत्रे, डॉ. ऋतुजा चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार व आरएमओ डॉ. माधुरी मोरे यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा