रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात – डॉ. सावंत

अहमदनगर – कांदा हे सर्वात महत्त्वाचे नगदी पीक असल्याने, त्याच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, स्थिर किंवा कमी होणारे उत्पादन ह्या भारतीय शेतकर्‍यांसाठी चिंतेच्या प्रमुख बाबी आहेत. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे भारतातील जमिनीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडले असून तिची सातत्याने हानी होत असल्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बाळासाहेब सावंत यांनी स्पष्ट केले. ते पारनेर तालुक्यात जवळा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दापोलीचेचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे, प्रगतशिल शेतकरी भाऊसाहेब किसन गोपाळे यांची उपस्थिती होती. नावीन्यपूर्ण ग्री-सोल्युशन्स (कृषी समाधान) हाच ह्यातून सुटकेचा मार्ग आहे आणि अलीकडेच बाजारात आणलेले ‘महाधन क्रॉपटेक’ खत म्हणजे कांद्याचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत आहे, ज्यामुळे कांद्याच्या पिकात 10 टक्क्याहून अधिक वाढ नोंदवली आहे. ‘महाधन क्रॉपटेकच्या’मधून कांद्याच्या पिकासाठी आवश्यक असलेले सर्व मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म पोषक अन्नद्रव्ये पुरविली जातात. ‘महाधन क्रॉपटेक’ला कांद्याचे पीक सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते त्या संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रगतिशील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यक्रमात दिसून आले.

भाऊसाहेब गोपाळे म्हणाले महाधन क्रॉपटेक हे खत वापरल्याने कांदा पिकाची जोमदार वाढ व एकसारख्या आकाराचे गोल कांदे मिळाले आणि उत्पादनही वाढले तसेच कांद्याची साठवण क्षमता देखील वाढली. महाधन क्रॉपटेकमुळे कांदा पिकास संतुलित पोषण मिळाल्याने माझा एकरी खतांवरील खर्च देखील कमी झाला, म्हणून कांद्याच्या पिकाची उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच निसर्गाला हानी न पोहोचवणारे समाधान उपयोगात आणण्याची तातडीची गरज आहे. म्हणून ‘महाधन क्रॉपटेक’ द्वारे कांद्याच्या वाढीव उत्पादनासाठी आवश्यक मात्रेच्या साह्याने समतोल पोषक अन्नद्रव्ये पुरविले जातात. ईव्हीपी आणि मुख्य – सेल्स आणि मार्केटिंग (सीएनबी) चे नरेश देशमुख, म्हणाले, ‘महाधन क्रॉपटेक’ ला मिळालेल्या प्रतिसादामुळे आनंदी आहेत.‘‘एसटीएल शेतकर्‍यांसोबत नेहमीच उभी राहिलेली आहे. कांद्याचे पीक घेणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला त्याची गरज असेल तेव्हा ते मिळेल. शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी सतत काम करण्याची आमची तयारी आहे.’’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा