नगर जल्लोष परिवार व नगर परिक्रमा हेरिटेज वॉककडून तिळगूळ व आलेपाकवडी सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचे नगरकरांकडून कौतुक, 92 वर्षीय मानेकाकांना होणार मदत

अहमदनगर – मकर संक्रांतीचे औचित्य साधून नगर जल्लोष परिवार (ट्रस्ट) व नगर परिक्रमा हेरिटेज वॉक यांच्या वतीने शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे तिळगूळ आणि आलेपाक वडी अर्पण करून ‘आलेपाक वडीसोबत आरोग्याची काळजी घ्या’ या शहरवासियांसाठी राबविल्या जाणार्‍या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून शहरात पायी फिरून आलेपाक वडी विक्रीचा व्यवसाय करणारे 92 वर्षीय नारायण माने यांना मदत होईल. यावेळी श्री विशाल गणपतीची आरती ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते करून उपस्थितांना तिळगूळ व आलेपाकवडीच्या पाकिटाचे वितरण करण्यात आले. त्यांनी या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी श्री विशाल देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा, पंकज मेहेर, बालाजी वल्लाल, ठाकूरदास परदेशी, दीपक गुंडू, सिद्धांत भुतारे, प्रतीक मेहेर आदी उपस्थित होते.

अहमदनगरमध्ये 1956 पासून आलेपाक वडी विकणारे माने काका कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वाभिमानाने कष्ट करून कोणतीही आर्थिक मदत नाकारणारे माने एक आदर्श उदाहरण आहे. त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. संक्रांतीला आलेपाक वडी भेटवस्तू म्हणून स्नेहीजनांना वाटून माने यांच्या प्रामाणिक कष्टाचा सन्मान नगरकरांनी करावा, असे आवाहन उपस्थितांनी यावेळी केले. यावेळी पंडित खरपुडे यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आले हे आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असून, त्याचे फायदे नगरकरांना पटवून देत त्यांना आलेपाक वडी वाटपाचा हा सामाजिक उपक्रम खूपच उत्साहवर्धक आहे. आल्याची विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणात आल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. माने काकांना मदतीच्या उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम स्पृहणीय आहे, असे सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांनी उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, मकर संक्रांत हा तिळगूळ घ्या, गोड बोलायचा सण आहे. या सणाचे औचित्य साधून आरोग्यदायी असलेली आलेपाकवडी वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. अहमदनगर शहरात पायी फिरून आलेपाक वडी विकणारे माने यांचा व्यवसाय वाढावा, त्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी हा उपक्रम राबवित आहोत. आले हा आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असून, अनेक आजारांवर गुणकारी आहे. याचे महत्त्व सर्वांना पटावे, अनेकांनी त्याचा वापर करावा या उद्देशानेच हा उपक्रम सुरू करण्यात आला.

आले औषधी असून, यातील फेनोलिकमुळे अपचन, तसेच जलनपासून आराम मिळतो. पित्त रोखले जाते. वेदनाशामक व तापमान कमी करणार्‍या आल्याचे प्रत्येकाने दैनंदिन सेवन करावे. आले हे सर्दी व खोकल्यावर गुणकारी सद्य परिस्थितीत त्याचा वापर खूपच परिणामकारक व महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे ते म्हणाले. मकर संक्रांतीचे औचित्य साधून नगर जल्लोष परिवार (ट्रस्ट) व नगर परिक्रमा हेरिटेज वॉक यांच्यावतीने शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर येथे तिळगूळ व आलेपाक वडी अर्पण करून ‘आलेपाक वडीसोबत आरोग्याची काळजी घ्या’ या शहरवासियांसाठी राबविल्या जाणार्‍या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. श्री विशाल देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे, ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा, पंकज मेहेर, बालाजी वल्लाल, ठाकूरदास परदेशी, दीपक गुंडू, सिद्धांत भुतारे, प्रतीक मेहेर आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा