लिंगाणा किल्ला

लिंगाणा किल्ला-शिवलिंगा सारखा दिसणारा 2965 फुटाचा सुळका म्हणजेच किल्ले लिंगाणा.3100 फूट मूळ उंची असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बांधला गेला. सह्याद्रीच्या कुशीत सर्व किल्ल्यांवर नजर ठेवायला गरुडा सारखा उभा. सह्याद्री पर्वत माळेत स्वराज्याच्या स्थापनेची कर्मभूमी तोरणा व स्वराज्याची पहिली राजधानी राजगडा पासून जवळ. गडाच्या पश्चिमेला गडांचा राजा दुर्गराज रायगड. रायगडला राजगृह तर लिंगण्याला कारागृह. याच कारण म्हणजे लिंगाणा किल्ल्याची उंची आणि छोटी रुंदी. स्वराज्याच्या कैद्यांना इथेच डांबून ठेवले जात. जगाच्या भटकंत्यांना, शिवभक्तांना आकर्षित करणारा किल्ला लिंगाणा. किल्ल्याची चढाई खूप कठीण गडावर जायचे तर दोरी शिवाय पर्याय नाही. किल्ल्यावर एक मोठी गुहा आहे एक पाण्याचे टाके आहे (पाणी पिणे योग्य). शिवकालीन सर्वात उंच व भयंकर किल्ला व आत्ताचा निसर्गाच्या हिरवळीने नटलेला किल्ला लिंगाणा. चांदबीबी मॉर्निंग ग्रुपचे जेष्ठ सदस्य गुरुदेव मोहन लुल्ला यांच्या आशीर्वादाने व जगबिरसिंग सिरोही, शंतनु मोहारे व बाळकृष्ण भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक येथील पॉइंट ब्रेक एडव्हेंचर यांच्या सहयोगाने दुर्ग लिंगाणा चढाई (ट्रेक) मोहीम 9 जानेवारी रोजी आयोजित केली होती. या मोहिमेसाठी आपल्या चांदबीबी मॉरनिंग गृपचे सदस्य जगबिर सिंग सिरोही (शिवम स्पोर्ट्स, भिंगार), भाकरे दादा (समर्थ ऍटो), विक्की चढ्ढा (औरस हॉटेलचे संचालक), संजय गाडेकर (लाकडी घाणा), गोविंद वाघमारे (एम.एस.इ.बी. कान्ट्रॅक्टर), किशोर बोरा (माजी नगरसेवक), अजय वधवा (सागर मोटर्स), नरेंद्र लोळगे (निखिल ज्वेलर्स), ज्ञानेश्वर तागड (स्वमी समर्थ कंट्रक्शन), व्यंकटेश बाले (स्टुडंट), ऋषिकेश कुलकर्णी (स्टुडंट) आम्ही सर्व 8 जानेवारी रोजी नगर वरून निघालो व रात्री रायलिंग पठारा जवळील मोहारी गावी सरपंचांच्या घरी मुक्काम केला.

9 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजता लिंगाणा चढाई (ट्रेकिंग) मोहीमेस सुरुवात केली. आभाळ दाटून आले होते भुरभुर सुरू झाली होती थोडे जंगल पार करून गेल्या नंतर डोंगर उतारावर पुर्ण दगडांनी बनलेली एक घळ लागते तिला बोरट्याची नाळ म्हणतात पुर्ण अंधारात बॅटरीच्या उजेडात नाळ पार करायला सुरूवात केली मध्ये एक पंधरा फुटांचा कातळ खडक लागतो तो साखळीच्या सहाय्याने उतरत सातशे ते आठशे फुटांची ती नाळ पार केली व पुढे डोंगरकपारीने दोराच्या सहाय्याने उतरत लिंगाणा पायथ्याला पोहोचलो. समोरचा तो सह्याद्रीचा मनात धडकी भरवणारा बेलाग लिंगाणा पाहिला, सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले. रविवार असल्याने ट्रेकर मंडळींची खूप गर्दी होती सकाळी 8 वाजता जय भवानी जय शिवाजीचा गजर करून गड चढायला सुरुवात केली. रोपाच्या सहाय्याने एक एक टप्पा पार करून आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो तेथे शंखनाद करून राजमाता जिजाऊ मॉं साहेबांच्या जयंती निमित्ताने त्यांना मान वंदना दिली व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच चांदबीबी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या मातोश्री अनुसयाबाई बोराटे यांचे 4-1-22 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांना ट्रेकर्स गृपच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. लिंगाणा गडावरून रायगडाचे दर्शन घेतले व छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून गड उतरायला सुरुवात केली. एक एक टप्पा पार करत काही ठिकाणी रॅपलिंग करत संध्याकाळी सात वाजता पायथ्याला पोहोचलो परत डोंगर कपारीने चांदण्यांच्या मंद प्रकाशात निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत बोराट्याची नाळ पार करत विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचलो. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे सातारा येथुन अरोही लोखंडे ही फक्त सहा वर्ष वयाची एक चिमुकली सहभागी झाली होती. चांगल्या चांगल्याच्या मनात धडकी भरवणारा लिंगाणा तिने लिलया पार केला. या मोहिमेचे आयोजक पॉइंट ब्रेक ऍडव्हेंचरचे जॉकी साळुंके, चेतन शिंदे, अर्चना गडधे यांनी उत्तमरीत्या नियोजन करून सर्वांना व्यवस्थीत रीतीने मार्गदर्शन करून क्लायंबीग व रॅपलिंग करून घेतले. प्रत्येक ट्रेकरचे एक स्वप्न असते एकदातरी लिंगाणा किल्ला चढाई (ट्रेक ) करावा. पी .बी .ए. टीम मुळे लिंगाणा किल्ला चढाई (ट्रेक) करून त्याच्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्य सर्वांना लाभले. एक विलक्षण चित्तथरारक, अविस्मरणीय असा ट्रेक.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा