मकर संक्रांतीनिमित्त ‘गुरु’मध्ये आकर्षक फर्निचर

अहमदनगर- 1990 पासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या नगर-मनमाड रोडवर असलेल्या सावेडी बस स्टॅण्डजवळील गुरु फर्निचर या अद्ययावत दालनात खास मकर संक्रांतीनिमित्त नव्या आकर्षक स्वरूपातील फर्निचर विविध व्हरायटीज्मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे फर्निचर ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून सर्व फर्निचरच्या किंमतीही एकदम रास्त आहेत. कुठल्याही प्रकारचे फर्निचर कुठेही खरेदी करण्याच्या अगोदर गुरु फर्निचर दालनास ग्राहकांनी अवश्य भेट देऊन येथील फर्निचरची व्हरायटी तसेच किंमती पाहाव्यात, असे आवाहन व्यवस्थापक शशिकान्त पाण्डेय यांनी केले. यासाठी ग्राहकांनी 9422225522 या क्रमांकावर कधीही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरु फर्निचरमध्ये ऑफिस टेबल, घरासाठी लागणारे विविध प्रकारचे सोफा सेट, कॉर्नर सेट, दिवाण, टि-पॉय, बेड, वॉर्डरोब, विविध आकारातील गार्डन झुला, देवघर, कपाट, बुक केस, डायनिंग टेबल्स यासह इतर अनेक प्रकारचे फर्निचर पाहण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे सागवान लाकडाचेही विविध प्रकारचे फर्निचर तयार करून दिले जाते. नगरमध्ये फर्निचर क्षेत्रात गुरु फर्निचर हे एक प्रतिष्ठित दालन आहे. फर्निचर क्षेत्रातील शहरातील सर्वात मोठे व प्रशस्त असे हे दालन आहे. नगर शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील व मराठवाड्यातील अनेक ग्राहक व संस्था येथे नेहमीच भेट देऊन खात्रीपूर्वक फर्निचर खरेदी करतात, अशी माहिती संचालक मनोहर गाबरा यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा