मनोविकलांगांना आपुलकीची खूप गरज असते – छायाताई खर्डे

संक्रातीनिमित्त सतरंग फौंडेशनतर्फे मनगाव प्रकल्पातील महिलांना मदत

अहमदनगर – माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून मनोविकलांगांना अशा आपुलकीची खूप गरज असते. माऊली सेवा प्रतिष्ठान अशाच अनाथ मनोविकलांग महिलांच्या जीवनात आशेचा किरण आणण्याचे काम करीत आहे. डॉ.धामणे यांचे हे कार्य देवदूताप्रमाणे असून त्यांना समाजाकडून पाठबळ मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सतरंग फौंडेशनच्या अध्यक्षा छायाताई खर्डे यांनी केले. मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त सतरंग फौंडेशनतर्फे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या मनगाव येथील प्रकल्पातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन तसेच ऍडल्ट डायपर्सची मदत करण्यात आली. यावेळी डॉ.राजेंद्र धामणे, माऊली सर, मोनिका मॅडम, स्वाती चंगेडिया, राजेश चंगेडिया, रवि राठोड उपस्थित होते.

खर्डे पुढे म्हणाल्या की, घर आणि मन हरवलेल्या माणसांचे गाव असलेले मनगाव हे मानवतेचे तीर्थस्थळ आहे. याठिकाणी मनोविकलांग महिलांची ज्या मायेने काळजी घेतली जाते ते खूपच कौतुकास्पद आहे. येथे असलेल्या महिलांच्या मुलांचीही तितक्याच आत्मियतेने काळजी घेतली जाते. ही मुले शिक्षणातून मुख्य प्रवाहात येण्यासाठी आवश्यक मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सतरंग फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. प्रकल्पातील महिलांना तीळगूळ देवून सतरंग फौंडेशनने संक्रातीचा सण साजरा केला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा