नगर तालुक्याच्या विकासाचा पाया काकासाहेबांनी रचला-ज्ञानदेव पांडूळे

माजी आमदार कि.बा ऊर्फ कै.काकासाहेब म्हस्के यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

अहमदनगर – अहमदनगर तालुक्याच्या विकासाचा पाया काकासाहेब म्हस्के यांनी रचला. काकांनी नगर तालुक्यात अनेक पाझर तलाव उभारले. रस्ते, शिक्षण,आरोग्य, यासंदर्भात उल्लेखनीय कार्य केले. त्यांचे कार्य आजही दिशादर्शक असेच आहे, असे प्रतिपादन ज्ञानदेव पांडुळे यांनी केले. मांडवे येथील काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या माजी आमदार कि. बा ऊर्फ कै.काकासाहेब म्हस्के यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास ज्ञानदेव पांडूळे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील पंडित, संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय निक्रड, संस्थेचे सचिव व गावचे सरपंच सुभाष निमसे आदी उपस्थित होते. सुनील पंडित म्हणाले की, कि. बा. काकांनी नगर तालुक्याचा आमदारकीच्या माध्यमातून विकास केला. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्याचे मोठे कार्य केले. त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनीही संधीचा शोध घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा, ग्रामीण भागातील विद्यार्थी असला तरीही आपल्या ज्ञानावर तो मोठ्या पदावर कार्य करू शकतो.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय निक्रड म्हणाले, विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या सोयीसाठी मांडवे येथे लवकरच अकरावी व बारावी (शास्त्र) शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. कै.काकासाहेब म्हस्के यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गुंड यांनी प्रास्ताविक केले, विद्यालयातील विद्यार्थी साईराज बेलेकर व अतुल शिंदे यांनी काकांच्या जीवनावर भाषणे केली. पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण व तिळगुळ वाटप यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशव निमसे, हेमंत भोगाडे, सचिन निक्रड, बबन खांदवे, अमोल शीलवंत, तुकाराम बोरुडे, अनर्थ गोवर्धन, सदाशिव भालेकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक कल्याण ठोंबरे यांनी तर आभार संस्थेचे सचिव सुभाष निमसे यांनी केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा