अ.नगर महापालिका माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षणात सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलला प्रथम पारितोषिक

(छाया-अमोल धोपावकर,अहमदनगर)

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण ‘माझी वसुंधरा अभियान – 2022’ शहरात राबविण्यात आले होते. या अंतर्गत शहरातील विविध शाळांची पाहणी करून निकषानुसार सर्व्हे क्षण करून पाहणी करण्यात आली. या अभियानाच्या निकषानुसार तारकपूर रोडवरील अ.नगर सिंधी एज्युकेशन सोसायटीच्या सेंट विवेकानंद स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्कूलने सलग तिसर्‍या वेळी हे पारितोषिक पटकावले आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणाचे हे प्रथम पारितोषिक सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलला प्रथम पारितोषिक महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अ.नगर सिंधी एज्युकेशन सोसायटीचे सचिव दामोधर बठेजा यांनी हे पारितोषिक स्वीकारले. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती पुष्पा बोरुडे, संस्थेचे विश्‍वस्त राम मेंघानी, प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे विश्‍वस्त अमर तलरेजा, रूपचंद मोटवाणी, दामोधर माखिजा, महेश मध्यान आदींनी शाळेला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

यावेळी बोलताना महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, शहरातील विविध शाळांनी अहमदनगर महापालिकेच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत सहभाग नोंदवला होता. ठरवून दिलेल्याा निकषानुसार सर्व शाळांची मनपाने पाहणी केली. यामध्ये सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांच्याबरोबरच द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळांनाही पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलने सलग तिसर्‍यांदा प्रथम क्रमांकाचे स्वच्छ सर्व्हेक्षणाचे पारितोषिक मिळविल्याबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले. संस्थेचे सचिव दामोधर बठेजा म्हणाले की, अ.नगर मनपा आयोजित स्वच्छ सर्व्हेक्षण माझी वसुंधरा अभियानात आम्ही सलग तीन वर्षांपासून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवित आलो असून, यामध्ये शाळेतील सर्वांचे महत्त्व योगदान आहे. प्राचार्या, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यामुळेच आम्ही येथपर्यंत मजल मारून सलग तिसर्‍या वर्षी शहरातील शाळांत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवू शकलो, असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा